ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर्स असोसिएशन( नियोजित )

नमस्कार आपले प्रेरणा स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या संस्थेची स्थापना करत आहोत ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर्स असोसिएशन( नियोजित ) महाराष्ट्रतल्या सर्व फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर हितासाठी ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर्स असोसिएशनचे सभासद बनण्यासाठी 900 /- रुपये व 100 /- रुपये अर्जाचे ठेवण्यात आले आहे व नंतर संस्थेच्या वार्षिक देखभाल खर्च 200/-रुपये असणार आहे संस्थेकडुन मंगळवार दिनांक19 जुलै 2016 पासून सभासद बनण्यासाठी अर्ज उपलब्ध होणार आहेत ठिकाण : लवकरच कळविण्यात येईल संस्थेकडुन सभासदांना मिळणारे फायदे व संस्थेची उद्दीष्टे 1) संस्थेचे सदस्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येईल 2) संस्थेच्या फेसबुक पेजवर किंवा वेबसाईट, वाॅटसपवर फोटोग्राफी विषयी माहिती दिली जाणार 3) वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात येईल 4) फोटोग्राफी क्षेत्रातील दिग्गज लोकांचे वकॆशाॅप आयोजित करण्यात येतील व सदस्यांना प्रवेश फी मध्ये 50% सुट मिळणार महाराष्ट्रतील वेगवेगळ्या जिल्ह्य़ात फोटोग्राफी वकॆशाॅपचे आयोजन करणार 5) फोटोचे प्रदर्शन भरविण्यात येईल ⛰🏝🏜🏟🌄⛲🎡🎑 6) "महाराष्ट्र राज्य फोटोफेअर" आयोजन करण्यात येणार आहे आणि सदस्यांना प्रवेश मोफत असणार🔖 (फोटोकॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा,लाईट्स, प्रिंटींग मशीन,अल्बम डिझाईनचे एडिटिंग साॅफ्टवेअर, व्हिडिओ एडिटिंग साॅफ्टवेअर, इत्यादी... कंपन्याचे प्रोडक्ट असणारच पण त्यांना आता त्यांच्या प्रोडक्ट विषयी माहिती देण्या करीता विशिष्ट पद्धतीच्या दालनाची व्यवस्था असणार ) 7 ) दर वर्षी फोटोग्राफी क्षेत्रातील माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येईल व प्रत्येक सदस्याला दिली जाणार 8) सामाजिक बांधिलकी जपली जाईल व समाज कार्यासाठी पुढाकार घेणार 9)महाराष्ट्रतल्या सर्व फोटोग्राफर्स असोसिएशनां एकत्र करुन महत्त्वाच्यां विषयावर भाष्य करणार व एकजुटीने सरकार दरबारी किंवा अन्य कोणत्याही विषयावर फोटोग्राफर्स च्या हितासाठी प्रयत्न करणार व लवकरच महाराष्ट्रतल्या सर्व जिल्ह्य़ास या विषयी भेट देणार आहोत🚊 संस्थेची नोंदणी ट्रस्ट मध्ये करत आहोत व पदाधिकारी आणि कार्यकारणी 9 जुलै 2016 रोजी जाहीर करण्यात येणार आहे आणि संस्थेच्या वेबसाईटवर माहिती देण्यात येईल. !! जय महाराष्ट्र !!